Technical Education News: तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्ष पोस्ट एस.एस.सी. POST S.S.C

पदविका अभ्यासक्रम POLYTECHNIC DIPLOMA, प्रथम वर्ष पोस्ट एच.एस.सी. औषधनिर्माणशास्त्र-PHARMACY. व इतर अभ्यासक्रमाचे

प्रवेश केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेमधून CENTRALISED ADMISSION PROCEDURE करण्यात येतात. त्यासाठी अर्ज करतांना संबंधित अभ्यासक्रमांच्या

प्रवेश नियमावलीत नमूद केलेल्या आवश्यक त्या प्रकरणी लागू असणारी खालील प्रमाणपत्रे सक्षम

प्राधिकार्यांकडून प्राप्त करून घेऊन ती तयार ठेवण्याबाबत प्रवेशोच्छुक उमेदवारांना तंत्रशिक्षण

संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांचे द्वारे सूचित करण्यात आले आहे .

आवश्यक प्रमाणपत्रे

१) जात / जमात प्रमाणपत्र ( Caste / Tribe Certificate) (महाराष्ट्रातील सक्षम प्राधिकारी यांनी विहीत प्रपत्रात निर्गमित केलेले)

(२) जात / जमात वैधता प्रमाणपत्र (Caste / Tribe Validity Certificate ) (महाराष्ट्रातील सक्षम प्राधिकारी यांनी विहीत प्रपत्रात निर्गमित केलेले). व इतर कागदपत्रे

टिप :

अ) इ.१० वी व १२ वी नंतरच्या पदविका प्रवेशासाठी जात/ जमात वैधता प्रमाणपत्र आवश्यक नाही. (मात्र प्रथम वर्ष पदविका किंवा द्वितीय वर्षातील पदविका अभ्यासक्रमाच्या राखीव जागेवर प्रवेश मिळालेल्या मागासवर्गीय उमेदवाराने प्रवेश मिळाल्यापासून १ महिन्याच्या आत जात/जमात प्रमाणपत्राच्या पडताळणीसाठी संबंधित जात / जमात पडताळणी समितीकडे योग्य भरलेला अर्ज सादर करावा लागेल.)

इतर कागद्पत्रे व सविस्तर माहितीसाठी तंत्रशिक्षण संचालनालयाच्या संकेत स्थळाला भेट द्या येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *